देशात कोठेही मीठाची कमतरता नाही: केंद्र सरकार

वृत्तसंस्था
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशात मीठाची कमतरता असल्याची अफवा पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्‍वमूमीवर केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले असून देशात कोठेही मीठाची कमतरता नसल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशात मीठाची कमतरता असल्याची अफवा पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्‍वमूमीवर केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले असून देशात कोठेही मीठाची कमतरता नसल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना पासवान म्हणाले, "देशात कोठेही मिठाची कमतरता नाही. जे लोक अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी. जे लोक 200 रुपये किलोने मीठ विकत आहेत त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. हे संपूर्णत: चुकीचे आहे. साखर, तांदूळ, गहू किंवा अन्य कोणत्याही पदार्थाची देशात कमतरता नाही.' याशिवाय ग्राहक व्यवहार मंत्रालयानेही कोणत्याही प्रकारची मीठाची अनपेक्षित कमतरता भासली तर त्याला सामोरे जाण्यासाठी मीठाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच "आम्ही प्रमुख 22 वस्तूंच्या किंमतींवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या माहितीनुसार देशात कोठेही मीठाच्या किंमतीत वाढ झालेली नाही' असेही मंत्रालयाने कळविले आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथून शुक्रवारी रात्री मीठाची कमतरता असल्याचा मेसेज पसरविण्यात आला. हा मेसेज वेगाने पसरला. त्यामुळे लोकांनी मीठ खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. काही ठिकाणी मीठाची पोती चोरीला गेल्याचे घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी मीठाचे भाव 200-400 रुपये प्रतिकिलो असे झाले. अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी रामपूर येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

देश

नवी दिल्ली : 'संघाला सत्ता आल्यावरच तिरंगा झेंड्याची आठवण आली,' या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेने घायाळ झालेल्या...

07.33 AM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

07.24 AM

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017