जुन्या नोटा आता बदलता नाही, तर भरता येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली ः नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सरकारतर्फे आज नवे निर्णय जाहीर केले. यानुसार बॅंकांमध्ये जुन्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आज मध्यरात्रीपासून थांबविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना उद्यापासून बॅंकेत जुन्या नोटा देऊन नव्या नोटा मिळणार नाहीत. त्यांना पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा फक्त बॅंक खात्यांमध्ये जमा करता येतील. दरम्यान, हजार रुपयांची नोट आजपासून चलनातून अधिकृतपणे रद्द झाली आहे. तर पेट्रोलपंपासह शैक्षणिक शुल्क, मोबाईल रिचार्जसारख्या सेवांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चालतील. ही सवलत 15 डिसेंबरपर्यंतच असेल.

नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घेतलेल्या आढाव्यात आढळून आले आहे, की बॅंकांमध्ये 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उद्यापासून बॅंक खात्यांमध्ये केवळ जुन्या नोटा भरता येतील. ग्राहकांना जुन्या नोटा देऊन नव्या नोटा बदलून मिळणार नाहीत. दरम्यान, सरकारने पेट्रोल पंप, वीजबिल, पाणीबिल यांसारख्या काही सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची सवलत जाहीर केली होती. त्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. ही मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, त्यात काही नव्या सेवांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु त्यासाठीही हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्यात आल्या आहेत. केवळ पाचशे रुपयांच्याच जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे
फक्त पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चालणाऱ्या सेवा
- केंद्र, राज्य सरकारी तसेच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे 2000 रुपयांपर्यंतचे शुल्क भरणे.
- केंद्र आणि राज्य सरकारी महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क भरणे
- 500 रुपयांपर्यंत प्रीपेड मोबाईल रिचार्ज करणे.
- सहकारी ग्राहक भांडारांमधून एका वेळी 5000 रुपयांची खरेदी करणे.
- फक्त वीजबिल आणि पाणीबिल भरणा. ही सवलत व्यक्ती, कुटुंबांसाठीच लागू असेल.
- महामार्गांवरील टोलनाक्‍यांवर 3 ते 15 डिसेंबरपर्यंत टोल भरणे