अवकाश मोहिमेत आता हवाई दलाचाही सहभाग 

अवकाश मोहिमेत आता हवाई दलाचाही सहभाग 

बंगळूर : मानवाला अवकाश मोहिमेवर पाठविण्याच्या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय हवाई दलाचाही सहभाग असणार आहे. यासंबंधीच्या अभ्यासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 2022च्या अंतिम मुदतीपर्यंत यामध्ये यश येईल, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज व्यक्त केला. 

एरोस्पेस मेडिसिन संस्था आधीपासूनच अंतराळवीरांच्या निवडीत सक्रिय सहभागी आहे. आम्हीही आता सहभागी होऊ. अतिशय कमी कालावधीत आम्ही ही कामगिरी बजावण्यात सक्षम होऊ याची मला खात्री आहे, असे त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिनच्या तीन दिवसांच्या 57व्या वार्षिक परिषदेत धनोआ बोलत होते. एरोस्पेस मेडिसिन तज्ज्ञ हे प्रत्यक्ष कार्यस्थळावर हवाई कर्मचाऱ्यांचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, असेही त्यांनी नमूद केले. 

यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणात भारतीय अंतराळवीर 2022पर्यंत अंतराळात प्रवास करतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. याच मुद्द्यावर बोलताना भारतीय एरोस्पेस मेडिसिन कमांडंटचे एअर कमोडोर अनुपम अगरवाल यांनीही अंतरावीरांची निवड करण्यासाठी आम्हाला 12 ते 14 महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले. अवकाश प्रवासासाठी अंतराळवीर तयार करणे हे आमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com