आता रांगा एटीएमबाहेर

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून उसळलेली बॅंकांतील गर्दी शनिवारी दहाव्या दिवशी काही प्रमाणात ओसरली. मात्र एटीएमबाहेरील रांगा कमी होण्याची चिन्हे पैशांच्या कमतरतेमुळे अद्याप दिसत नाहीत. 

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून उसळलेली बॅंकांतील गर्दी शनिवारी दहाव्या दिवशी काही प्रमाणात ओसरली. मात्र एटीएमबाहेरील रांगा कमी होण्याची चिन्हे पैशांच्या कमतरतेमुळे अद्याप दिसत नाहीत. 

आज सर्व बॅंकांनी केवळ त्यांच्याच खातेदारांना जुन्या नोटा बदलून दिल्या. यात खातेदार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात आली होती. जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा दररोज दोन हजार रुपये आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही बॅंकांतील रांगा कमी झाल्या असून, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले. बॅंकांत वारंवार जुन्या नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी बोटावर शाई लावण्यात येत आहे. यामुळेही गर्दी कमी होऊ लागली आहे. 

देशभरात पैशाची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत आहेत. मात्र रोख रकमेवर व्यवहार करणाऱ्या भाजी विक्रेत्यांपासून ढाबावाले आणि छोट्या किराणा दुकानदारांच्या व्यवसायावर नोटाबंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. चलनातील छोट्या नोटा नसल्याने लोकांना दूध, भाज्या, औषधे खरेदी करण्यात अडचणी येत आहेत.

देशभरातील रुग्णांलयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना औषधे, खाद्यपदार्थ खरेदी करण्यात समस्या निर्माण होत आहे. साहित्याचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत. यामुळे रोजंदारी मजूर रोजगाराविना असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नोटाबंदीचे चटके 
- छोट्या व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प 
- दूध, भाज्या खरेदी करण्यात अडचणी 
- रुग्णांना औषधे मिळेनात 
- साहित्याचा पुरवठा नसल्याने बांधकाम क्षेत्र ठप्प 
- रोजंदारी मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

देश

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने...

02.06 PM

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये...

01.48 PM

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM