ओडिशात उष्माघाताने बारा जणांचा मृत्यू

पीटीआय
रविवार, 28 मे 2017

संबलपूर जिल्ह्यात चार, अंगूल, बारगड जिल्ह्यात प्रत्येकी तीन आणि बालनगीर व भद्रक जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

भुवनेश्‍वर : ओडिशामध्ये उष्माघाताने बळी गेलेल्या व्यक्तींची संख्या रविवारी बारा झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील नागरिकांना सूर्य प्रकोपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या उन्हाळ्यात राज्यात 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आज झालेल्या आणखी एकाच्या मृत्यूमुळे हा आकडा आता 12 झाला आहे. संबलपूर जिल्ह्यात चार, अंगूल, बारगड जिल्ह्यात प्रत्येकी तीन आणि बालनगीर व भद्रक जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

अंगूल येथे आज राज्यातील सर्वाधिक 42.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तसेच, अन्य चार ठिकाणी पारा 40 अंशांपेक्षा अधिक होता. राज्यात काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे उन्हाचा पारा कमी होऊ लागला आहे.

देश

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

10.24 AM

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या...

09.12 AM

नवी दिल्ली : मागणीअभावी अर्थव्यवस्थेतील मंदी आणि त्यामुळे विकासदरावर होणारा परिणाम याची चिंता सरकारला भेडसावते आहे. त्यामुळे यावर...

07.09 AM