कानपूरमध्ये 80 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

कानपूर - मेरठमध्ये एका बिल्डरकडे 25 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्याची घटना नुकतीच घडली होती, त्यानंतर आता एका हॉटेलसह इतर तीन ठिकाणी जवळपास 80 कोटींच्या  जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून याबाबत तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरसह अनेक जिल्हांमध्ये 'मनीचेंजर गॅंग' सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गगन हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नजीराबादमध्ये आणखी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या सर्व ठिकाणांहुन जवळपास 80 कोटींच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 

या प्रकरणी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर रोकॉर्ड ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.  

गगन हॉटेलमध्ये संतकुमार(वाराणसी), संजय सिंह, अनिल(अमरावती),प्रकाश गायमा(सहारणपूर) यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Old currency worth Rs 80 crore seized from Kanpur