नोटा तस्करीप्रकरणी एकाला अटक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

 बनावट नोटांच्या तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी एका मुख्य संशयिताला अटक केली. सद्दाम हुसेन असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून 26 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या मागे मोठी टोळी कार्यरत असून, सद्दाम याने पश्‍चिम बंगालमधील माल्दा येथून दुसऱ्या संशयिताकडून (अमिरुल) या नोटा ताब्यात घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.
 

हैदराबाद - बनावट नोटांच्या तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी एका मुख्य संशयिताला अटक केली. सद्दाम हुसेन असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून 26 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या मागे मोठी टोळी कार्यरत असून, सद्दाम याने पश्‍चिम बंगालमधील माल्दा येथून दुसऱ्या संशयिताकडून (अमिरुल) या नोटा ताब्यात घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.

हे प्रकरण 2015 मधील एका घटनेशी संबंधित असून, एनआयएने संबंधित दोघाजणांवर 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, या प्रकरणी एनआयएने रुस्तम ऊर्फ हाशमत व मोहंमद हाकीम या अन्य दोन व्यक्तींनाही अटक केली आहे. 
 

Web Title: One arrested for smuggling money