मोटारीच्या अपघातात एक ठार, चार जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

शहरातील सायबराबाद परिसरात एका मोटारीने एका खांब्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

हैदराबाद : शहरातील सायबराबाद परिसरात एका मोटारीने एका खांब्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. एका स्कॉर्पिओ मोटारीने वाहतूक दिव्याच्या खांब्याला धडक दिली. त्यामुळे चार दुचाकी आणि चार चारचाकी वाहने अपघातग्रस्त झाली. या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओच्या चालकाला ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

शनिवारी सकाळीही दोन स्वतंत्र अपघात झाले होते. या अपघातामध्ये आठ जण ठार झाले होते. त्यामध्ये दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये काम करणारे खरगपूर आयआयटीमधील तीन पदवीधारक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला.