नक्षलवाद्यांच्या सुरुंग स्फोटात एक जवान हुतात्मा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा युनिटचा एक जवान हुतात्मा झाला, तर अन्य एक जवान जखमी झाला. छत्तीसगडच्या सुकना जिल्ह्यातील पुसवाडा गावात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.

रायपूर -  नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा युनिटचा एक जवान हुतात्मा झाला, तर अन्य एक जवान जखमी झाला. छत्तीसगडच्या सुकना जिल्ह्यातील पुसवाडा गावात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. केंद्रीय राखीव दलाचे 206 बटालियनचे एक कोब्रा पथक रस्ता खुला करण्यासाठी गेले असताना नक्षलवाद्यांनी सकाळी पावणेआठच्या सुमारास हा स्फोट घडवून आणला, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या स्फोटात कोब्रा बटालियनचे पोलिस उपनिरीक्षक राजेशकुमार हुतात्मा झाले. त्याचप्रमाणे याच बटालियनचे कॉन्स्टेबल माणिक तिनपारे हे किरकोळ जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. तिमिलवाडा ते दोरनापालदरम्यान 500 किमीचा रस्ता खुला करण्यासाठी हे पथक गेले होते. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी पुसवाडाजवळील जंगलाची घेराबंदी करीत असतानाच कोब्रा बटालियनचे जवान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटाच्या संपर्कात आले आणि त्याच वेळी मोठा स्फोट झाला, असे ते म्हणाले. 
 

Web Title: one soldier die in naxalite attack

टॅग्स