गुजरातेतील शेतकऱ्यांचे आंदोलन हे विरोधकांचा "स्टंट': रूपानी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

राज्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन ही विरोधकांची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनाला बळी पडू नये, असे आवाहनही रूपानी यांनी केले आहे. 

राजकोट : राज्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन ही विरोधकांची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनाला बळी पडू नये, असे आवाहनही रूपानी यांनी केले आहे. 

रूपानी म्हणाले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते आणि त्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष ठेवते. त्यांचे प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्र आणि गुजरात सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे समाधान करण्यासाठी सदैव तयार आहेत. रूपानी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता म्हटले की, गुजरातमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन ही विरोधकांची स्टंटबाजी आहे. कारण पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत.

निवडणुका जवळ येताच विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची आठवण होते. मात्र, गुजरातचे शेतकरी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्‍वास रूपानी यांनी व्यक्त केला. गुजरातमध्ये काल कॉंग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनात शेतकऱ्यांनी दूध फेकले होते. 

Web Title: Opposition's "stunt" for the farmers' movement in Gujarat says Rupani