पद्मनाभस्वामी मंदिरातून 186 कोटींचे सोने गायब

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

तिरुअनंतपुरम - केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरातून सोन्याची 186 कोटी रुपये किंमतीची सोन्याची 769 भांडी गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विनोद राय समितीने केलेल्या मंदिराच्या ऑडिटमध्ये ही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय मंदिर व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्‍टोबर 2015 मध्ये राय समितीला ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विनोद राय समितीने पाहणी करून पाच भागांमध्ये एक हजार पानांचा अहवाल तयार केला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Web Title: Padmanabhaswamy temple 186 crore missing gold

टॅग्स