'पाक सैन्याकडून पश्तून मुलींचा सेक्ससाठी वापर'

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

आम्ही आता पश्तूनिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना करून पाक सैन्याविरुद्ध संघर्ष करणार आहोत. दहशतवाद मिटविणे हेच आमचे ध्येय आहे. पाक सैन्याकडून आतापर्यंत पश्तून नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार वझिरीस्तानमधील पश्तून नागरिकांवर अत्याचार करत असून, पश्तून मुलींचा पाकिस्तानी सैन्याकडून सेक्ससाठी वापर करण्यात येत असल्याचा, आरोप पश्तून नेते उमर दौड खट्टक यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरचा मुद्दा सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करणारा पाकिस्तान अंतर्गत कलह मिटविण्यात अपयशी ठरला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून सरकारला होत असलेला विरोध आणि आता पश्तून नागरिकांकडूनही पाक सरकारला विरोध होत आहे. पश्तून नागरिकांनी आता बंदुक हातात घेऊन पाकिस्तानविरुद्ध संघर्ष करण्याची तयारी केली आहे.

पश्तून नेते उमर खट्ट्क म्हणाले, की आम्ही आता पश्तूनिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना करून पाक सैन्याविरुद्ध संघर्ष करणार आहोत. दहशतवाद मिटविणे हेच आमचे ध्येय आहे. पाक सैन्याकडून आतापर्यंत पश्तून नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे. वझिरीस्तानमधून शेकडो पश्तून मुलींचे अपहरण करून लाहोरमध्ये गुलाम बनविण्यात आले. त्यांचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून सेक्ससाठी करण्यात येत आहे. स्वात आणि वझिरीस्तानमध्ये पाक सैन्याने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानमध्ये अण्वस्त्रेही काळ्या बाजारात मिळतात. पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे, जो आपल्याच लोकांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहे.

देश

लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले...

06.03 AM

समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक...

03.30 AM

सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत...

02.33 AM