पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 1 नागरिकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमेवरील गावांतील घरांवरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सहा जण जखमी झाले होते. त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून आज (रविवार) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवरील भारतीय चौक्यांवर व घरांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी आहेत.

जम्मू काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आज सकाळी जोरदार गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांत सतत गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय लष्कराने शनिवारी घुसखोरीचा कट उधळून लावत दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते.

आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमेवरील गावांतील घरांवरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सहा जण जखमी झाले होते. त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाकच्या गोळीबारात लष्करी जवान जखमी झालेला नाही. अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याने गेल्या दोन दिवसांत तिसऱ्यांदा गोळीबार केला आहे.