पाकिस्तानच्या कर्मचाऱ्यांची तालिबान्यांकडून सुटका

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरमधील कर्मचाऱ्यांची तालिबानांनी नऊ दिवसांनंतर शनिवारी सुटका केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील "एमआय-17‘ हे मालवाहतूक करणारे सरकारी हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी रशियाला जात असताना तांत्रिक बिघाड होऊन गेल्या गुरुवारी (ता. 4) अफगाणिस्तानमधील लोगार प्रांतात कोसळले होते. हा भाग तालिबान संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. तालिबान्यांनी हेलिकॉप्टरमधील सहा कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवले होते. कर्मचाऱ्यांमध्ये पाच पाकिस्तानी, एक रशियन तंत्रज्ञाचा समावेश आहे.

त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक टोळीतील ज्येष्ठ लोकांनी प्रयत्न केले. त्यांची बोलणी यशस्वी ठरून तालिबान्यांनी कर्मचाऱ्यांची सुटका केली. आज हे कर्मचारी इस्लामाबादमध्ये पोचले. पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरील फाता येथे त्यांची सुटका करण्यात आली. नंतर त्यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादेत नेण्यात आले. दरम्यान, हेलिकॉप्टर पडले तेव्हा त्यात सात कर्मचारी असल्याचे प्रथम सांगण्यात येत होते. मात्र, नंतर सहाच कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. एकाची तब्येत बरी नसल्याने तो या हेलिकॉप्टरने गेला नाही, असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.