तो रोगी निपाहचा नव्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पणजी : गोवा वैद्यकीय इस्पितळात (गोमेकॉ) भरती असणाऱ्या केरळमधील निपाहग्रस्त संशयित रुग्णाच्या रक्‍त चाचणीचा अहवाल गोमेकॉतील डॉक्‍टरांच्या हाती लागला. अहवालातील रक्‍त चाचण्यांनुसार हा व्यक्‍ती निपाहग्रस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दोन दिवसांपूर्वी वीस वर्षीय या तरुणाला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. या व्यक्‍तीमध्ये निपाहसंबधित रोगाची लक्षणे आढळून येत असल्याने राज्यभरात याबाबतीत खबरदारी आणि चेतावणीही देण्यात आली होती. या रुग्णाला गोमेकॉतील वेगळ्या कक्षात विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. 

"पुणे येथील वायरॉलीजीकल इन्स्टिट्यूटमध्ये या व्यक्‍तीच्या रक्‍ताचे नमुने पाठविले होते. संबंधित व्यक्‍तीमध्ये निपाहग्रस्त रोगांसंबधित काही लक्षणे आढळून आल्याने भविष्यातील काळजी घेण्यासाठी आम्ही ही खबरदारी घेतली होती".  - आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

Web Title: that patient is not infected with nipah virus

टॅग्स