'पाक दहशतवादी देश'; अमेरिकेत विक्रमी याचिका

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन - दहशतवादाला प्रोत्साहन देऊन, दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश असे अधिकृतपणे जाहीर करावे, या मागणीसाठी व्हाईट हाऊसला पाठविण्यात आलेल्या अमेरिकन याचिकेवर शेवटच्या दिवशी 50 हजार स्वाक्षऱ्या झाल्या आतापर्यंत त्यावर एकूण 6 लाख 65 हजार 769 जणांनी स्वाक्षरी केली असून अमेरिकेतील ही विक्रमी आणि सर्वाधिक लोकप्रिय याचिका ठरली आहे.

याचिकेमध्ये "आम्ही लोक पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहोत‘ असे म्हटले आहे. स्वाक्षऱ्यांच्या तुलनेत व्हाईट हाऊसला आतापर्यंत प्राप्त झालेल्या याचिकांपैकी ही सर्वाधिक लोकप्रिय याचिका ठरली आहे. व्हाईट हाऊसला प्राप्त झालेली यापूर्वीची याचिका केवळ साडे तीन लाख जणांनी स्वाक्षरीत केली होती. मात्र तो विक्रम मोडित काढत पाकसंदर्भातील ही याचिका नव्या विक्रमासह सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. याबाबत व्हाईट हाऊसकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

एखाद्या याचिकेवर चर्चा घडविण्यासाठी त्यावर किमान एक लाख जणांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्‍यक असते. त्यामुळे साधारण सात लाखाच्या जवळपास स्वाक्षऱ्या झालेल्या या याचिकेवर अमेरिकन सरकार चर्चा करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.