अहमदाबाद पालिकेचा प्लॅस्टिकबंदीचा निर्णय 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

महाराष्ट्राकडून प्रेरणा घेत गुजरातेतील अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकांनी आजपासून प्लॅस्टिकबंदी जाहीर केली. आजच्या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त हा निर्णय करण्यात आला. 
 

अहमदाबाद - महाराष्ट्राकडून प्रेरणा घेत गुजरातेतील अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकांनी आजपासून प्लॅस्टिकबंदी जाहीर केली. आजच्या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त हा निर्णय करण्यात आला. 

अहमदाबाद शहरात दररोज 241.5 टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो आणि राज्यात हे प्रमाण सर्वांत जास्त आहे. देशातील साठ शहरांचा विचार केला, तर अहमदाबादचा क्रमांक सहावा आहे. पाण्याचे प्लॅस्टिक पाउच, कप, तंबाखूजन्य उत्पादनांचे पाउच आणि एकदाच वापरता येणाऱ्या कॅरिबॅगवर बंदी घालण्यात आल्याचे अहमदाबाद महापालिकेने जाहीर केले आहे. महापालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत बंदी घालण्यात आलेली 3295 किलो प्लॅस्टिक उत्पादने जप्त करण्यात आली असून, 42.82 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बंदी घातलेल्या प्लॅस्टिक उत्पादनांची विक्री केल्याबद्दल 13 हजार 493 जणांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. 
 
प्लॅस्टिकचा डोंगर... 

241. 5 टन 
अहमदाबाद 

149.6 टन 
सुरत 

27.4 टन 
बडोदा 

15.9 टन 
राजकोट 

Web Title: plasitc ban in ahemadabad