महाराष्ट्राची अशीच अखंड प्रगती होत राहो: मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

आज महाराष्ट्रदिन! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझ्या अनेक शुभेच्छा! येणाऱ्या काळात सुद्धा महाराष्ट्राची अशीच अखंड प्रगती होत राहो, या शुभकामना! जय महाराष्ट्र!

नवी दिल्ली - महाराष्ट्र दिनानिमित्त आज (1 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. याबरोबरच कामगार दिनाचाही उत्साह दिसून येत आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील नागरिकांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी ट्विटवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे, की आज महाराष्ट्रदिन! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझ्या अनेक शुभेच्छा! येणाऱ्या काळात सुद्धा महाराष्ट्राची अशीच अखंड प्रगती होत राहो, या शुभकामना! जय महाराष्ट्र!