पंतप्रधान मोदी आज प. बंगाल, झारखंड दौऱ्यावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 25) पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शांतिनिकेतन येथील विश्‍व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 25) पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शांतिनिकेतन येथील विश्‍व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या उपस्थित राहणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक असलेल्या बांगलादेश भवनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या कार्यक्रमानंतर पंतप्रधान झारखंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तेथील सिंध्रीमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची कोनशिला त्यांच्या हस्ते राखण्यात येणार आहे. 

Web Title: PM Modi today tour on Bengal, Jharkhand