अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती खालावली

वृत्तसंस्था
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली. 

वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'लाईफ सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे. 'एम्स'तर्फे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहितीपत्रक रात्री प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे त्यात म्हटले आहे. 

वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान मोदी 'एम्स'मध्ये आले. जवळपास ५० मिनिटे मोदी 'एम्स'मध्ये होते. गेल्या दोन महिन्यांत मोदी यांनी चार वेळा 'एम्स'मध्ये वाजपेयी यांची भेट घेतली आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. 

किडनीला झालेल्या संसर्गामुळे ११ जून रोजी वाजयेपी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २००९ मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 

Web Title: PM Modi visits AIIMS to enquire about Atal Bihari Vajpeyees health