पोलिसांच्या भूमिकेमुळे अलवार हत्या प्रकरणाचे गुढ वाढले

police investigation on Friday night in Alwar’s Ramgarh town is a mystery
police investigation on Friday night in Alwar’s Ramgarh town is a mystery

जयपुर : अलवार जिल्ह्यातील गो-तस्करीच्या संशयावरून हत्या करण्यात आलेल्या पिडीताला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिसांना तीन तास कोणाची वाट पहावी याचे गुढ काही उलगडत नाही.

शुक्रवारी (ता.20) रात्री अलवार जिल्ह्यातील लालवंडी जंगलात अकबर खान (वय 28 वर्ष, कोलेगाव हरियाणा) या तरुणाला गो-तस्करीच्या संशयावरून आपला जिव गमवावा लागला. रात्री 1 वाजता पोलिस घटनास्थळी पोहचले होते. घटनास्थळापासून सरकारी रुग्णालय केवळ चार किमीच्या अंतरावर आहे. तरिही पोलिसांनी जखमी अकबर खान याला पहाटे 4 वाजता रुग्णालयात दाखल केले. चार किमी अंतर जाण्यासाठी पोलिसांना तीन तास का लागले असा प्रश्न उपस्थित करुन पोलिसांनकडेच संशयाने पाहिले जात आहे. खान याला रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रामगड सरकारी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र यादव, परमजीत सिंह आणि नरेश सिंह या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव, भडकवणे, जखमी करून खून करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. 

रामगड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहन सिंह यांनी एफआयआर दाखल केली आहे. सिंह म्हणाले, नवल किशोर शर्मा (गोरक्षक, विश्व हिंदू परिषद) याने रात्री पाऊने एक च्या दरम्यान काही लोक गो-तस्करी करणाऱ्या व्यक्तीला मारत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर दोन पोलिस कर्मचारी शर्मा यांना घेऊन चार किमी अंतरावर असणाऱ्या घटनेच्या ठिकाणी पोहचले. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर 20 ते 25 मिनीटात पोलिस घटनास्थळी पोहचले. असे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल बेनीवाल यांनी म्हटले आहे. 

"आम्ही जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा धर्मेंद्र यादव आणि परमजीत सिंह हे दोघेजन दोन गायींसोबत जिखलानी भरलेले दिसले. आम्ही त्यांना पाण्याने धुवून स्वच्छ केले आणि काय झाले हे विचारले असता त्यांनी स्थानिक नागरिकांनी आम्हाला दांडक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची खोटी माहिती आम्हाला सांगितली." असे मोहन सिंह यांनी एफआयआर मध्ये नमूद केले असल्याचे सांगितले.

अकबर खान यांना उपचारासाठी आणले असता त्यांचा एक पाय मोडला होता. त्याला रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. असे डॉ. हसन अली खान यांनी स्पष्ट केले आहे. घटनेच्या तब्बल पाच तासांनी म्हणजे शनिवारी (ता. 21) सकाळी साडेऊवाजता एफआयआर दाखल करण्यात आली. घडलेल्या सर्वच घडामोडींमुळे पोलिसांच्या भूमिकेवरील संशय वाढत असून प्रकरणामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, यामध्ये एका तरुणाचा बळी गेला हे मात्र, सत्य आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com