रुग्णांच्या नातेवाईकांकडून 'कमल हसन चले जाव'च्या घोषणा

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी जखमींची व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेट घेतली. पण त्याच्या भेटीला विरोध करत नागरिकांनी आंदोलन केले. 

तमिळनाडू : तामिळनाडूमध्ये झालेल्या 'स्टअरलाईट कॉपर प्लांट'च्या विरोधात झालेल्या हिंसाचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीर जखमी झाले.

तमिळमाडूमधील थुथूकुडी गावात नागरिकांनी या प्लांटला विरोध दर्शविल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नागरिकांना विनाकारण जीव गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी जखमींची व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेट घेतली. पण त्याच्या भेटीला विरोध करत नागरिकांनी आंदोलन केले. 

मक्कल निधी मैय्यम या पक्षाचे प्रमुख असलेले व नुकतेच राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेले कमल हसन यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण ते रूग्णांना भेटायला गेले असता, त्यांनी संताप व्यक्त करून हसन यांना तेथून जाण्यास सांगितले. 'या गोळीबाराची चौकशी व्हावी, मी स्वतः अशी मागणी करतो व नक्कीच यावर पर्याय शोधू', असे हसन यांनी सांगितले. तसेच जखमींना व मृतांच्या नातेवाईकांना याची नुकसान भरपाई मिळेल व नागरिकांच्या मागणीनुसार हा प्लांट बंद केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या हिंसाचाराचा निषेध करत कमल हसन यांच्या पक्षाने तमिळनाडू सरकारला मृतांचा व जखमींचा विचार करता हा प्लांट बंद व्हावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
 

Web Title: politician kamal hasan meets injured in sterlite protest but relatives opposed him