कुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

या पोस्टर्सवर लिहिले आहे, की 'भाजपा का यार है, कवि नहीं गद्दार है, ऐसे धोखेबाजों को बाहर करो.. बाहर करो'. मात्र ही पोस्टर्स कोणी लावली आहेत, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात दिल्लीतील आप कार्यालयाबाहेर पोस्टर्स लावण्यात आली असून, या पोस्टर्सवर विश्वास हे विश्वासघातकी आहेत आणि भाजपचे एजंट असल्याचे लिहिण्यात आले आहे.

या पोस्टर्समुळे आपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकतेच कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केले होते. आता आपच्या कार्यालयाबाहेरच कुमार विश्वास यांच्याविरोधात पोस्टर्स झळकत आहेत. दिल्ली सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभागानेच आपच्या कार्यालयाला नोटीस पाठवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता याच कार्यालयाबाहेर पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

या पोस्टर्सवर लिहिले आहे, की 'भाजपा का यार है, कवि नहीं गद्दार है, ऐसे धोखेबाजों को बाहर करो.. बाहर करो'. मात्र ही पोस्टर्स कोणी लावली आहेत, याबाबत माहिती मिळू शकली नाही. विश्वास आणि केजरीवाल यांच्यातील वादातून हे पोस्टर्स लावण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.