'राजद'च्या माजी खासदारांना जन्मठेपेची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या खटल्याची सुनावणी घेण्यात आली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे दिनानाथ सिंह यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात या तिघांना दोषी सिद्ध केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. 

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना आज (मंगळवार) हत्ये प्रकरणी दोषी ठरविताना न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली.

प्रभुनाथ सिंह यांच्यासह अन्य दोघांना 1995 मध्ये आमदार अशोक सिंह यांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. आज या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. हजारीबाग जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी शिक्षा सुनावली. प्रभुनाथसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ दिनानाथ सिंह आणि गावचे माजी प्रमुख रितेश सिंह यांना शिक्षा झाली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या खटल्याची सुनावणी घेण्यात आली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे दिनानाथ सिंह यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात या तिघांना दोषी सिद्ध केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते तिघेही हजारीबाग कारागृहात आहेत.