राहुल गांधींच्या फॉलोअर्समध्ये 10 लाखांची वाढ

वृत्तसंस्था
रविवार, 24 सप्टेंबर 2017

गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांचे ट्विटर हँडल राहुल यांच्या ट्विटर हँडलशी जोडण्यात आले आहे. तसेच ट्विटर अकाउंट नसलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांचे अकाउंट सुरु करण्यात आले आहे. यापैकी बरेचसे अकाउंट ट्विटरकडुन 'व्हेरीफाय' करुन घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - ट्विटरवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे फॉलोअर्स 2 महिन्यात 10 लाखांनी वाढले आहेत. जुलै महिन्यात राहुल गांधींच्या ट्विटर अकाउंटला 24.93 लाख फॉलोअर्स होते तर आत दोन महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये 34 लाखांपर्यंत हा आकडा गेला आहे. काँग्रेस पक्षातर्फे सोशल मिडीयावर लक्ष केंद्रित केल्याचा हा परिणाम असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांचे ट्विटर हँडल राहुल यांच्या ट्विटर हँडलशी जोडण्यात आले आहे. तसेच ट्विटर अकाउंट नसलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांचे अकाउंट सुरु करण्यात आले आहे. यापैकी बरेचसे अकाउंट ट्विटरकडुन 'व्हेरीफाय' करुन घेण्यात आले आहे. 'व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट' हे त्या व्यक्तीचे/संस्थेचे अधिकृत अकाउंट असल्याची खात्री देत असल्याने त्याचा फायदा फॉलोअर्स वाढण्यासाठी झाल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधींचे ट्विटर फॉलोअर्स दोन महिन्यात 10 लाखाने वाढले असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर फॉलोअर्सच्या प्रमाणात ते कमीच आहे. मोदींचे ट्विटरवर सध्या 3 कोटी पेक्षा जास्त ट्विटर फॉलोअर्स आहेत.