राहुल गांधी यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगीची गरज नाही; काँग्रेसकडून खुलासा

लंडन दौऱ्याबाबत काँग्रेस पक्षाकडून अखेर खुलासा
Rahul gandhi does not need permission to visit london bjp criticize
Rahul gandhi does not need permission to visit london bjp criticizesakal

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या लंडन दौऱ्यावर भाजपकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अखेर खुलासा केला. राहुल यांनी परदेशी देणग्या नियमनासंदर्भातील कायद्यांतर्गत (एफसीआरए) परवानगी घेतली होती. लोकप्रतिनिधी या नात्याने राजकीय परवानगी घेण्याची राहुल यांना आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले. महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी अशा निरर्थक मुद्द्यांवर चर्चा घडविली जात आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की मंत्री किंवा सरकारी लाभाचे पद असलेली व्यक्ती, सरकारी अधिकारी, आयोगाचे सदस्य यांसारख्या मंडळींना दौऱ्यासाठी अशा परवानगीची आवश्यकता असते.

या दौऱ्यातील राहुल यांच्या एका मुलाखतीची आणि त्यातील दीर्घ `पॉजेस''चीही चर्चा सुरू आहे. त्यावरूनही सुरजेवाला यांनी भाजपला सुनावले. ते म्हणाले की, ‘इंदिरा गांधी यांचा नातू, राजीव गांधी यांचा मुलगा म्हणून राहुल यांनी हिंसाचाराशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना घेतलेला वेळ आणि उच्चारलेला क्षमाशीलता हा शब्द यावरून त्यांची खिल्ली उडविली जात असेल तर हा प्रकार किव करण्यासारखा आहे.‘

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाजपची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नव्हते आणि संघाच्या कार्यालयावर ५२ वर्षे राष्ट्रध्वज फडकावण्यात आला नव्हता. या संघटनेत महिलांना प्रवेश नाही. असे असताना देशासाठी बलिदान देणाऱ्यांची खिल्ली उडविणे योग्य नाही.

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com