राहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. '2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या विरोधात जनतेने महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे आणि कर्नाटकच्या निवडणुकीनंतर ही कारवाई पूर्ण होईल', अशी टिप्पणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. 

भाजप आणि काँग्रेसमधील लढाई ही 'लोकशाही विरुद्ध घराणेशाही' अशी आहे, असा दावाही पात्रा यांनी केला. 'शेवटी लोकशाहीचाच विजय होणार आहे आणि घराणेशाही पराभूत होणार आहे', असे पात्रा म्हणाले. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी काल (सोमवार) फेटाळला. त्यानंतर पात्रा यांनी काँग्रेसवर या मुद्यावरून निशाणा साधला. 

'नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयावर वर्चस्व गाजवू पाहत आहे. राज्यघटनेची मोडतोड आम्ही सहन करणार नाही', असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पात्रा म्हणाले, "राहुल गांधी हे अपयशी नेते आहेत. त्यांच्या राजकारणाच्या शैलीविषयी ते अजूनही देशाच्या जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण करू शकलेले नाहीत. त्यामुळेच आता देशातील संस्थांमध्ये राजकारण घुसवून त्या उध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. घराणेशाही आता या देशात चालणार नाही, हे उमगल्यामुळेच राहुल गांधी हताश झाले आहेत.''

Web Title: Rahul Gandhi is a failed leader says BJP