राहूल गांधी निपाह व्हायरस सारखे

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

दोन दिवसांपुर्वी केलेल्या ट्विट मध्ये, राहूल गांधी हे निपाह व्हायरस सारखे आहेत, त्यांच्या संपर्कात येणारे पक्ष संपुष्टात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.  

दिल्ली : सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करण्याची मालिका थांबायला तयार नाही. हरियाणातील मंत्री अनिल विज यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची तुलना निपाह व्हायरसशी करून नविन वादाला सुरूवात केली. दोन दिवसांपुर्वी केलेल्या ट्विट मध्ये, राहूल गांधी हे निपाह व्हायरस सारखे आहेत, त्यांच्या संपर्कात येणारे पक्ष संपुष्टात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.  विज हे अशाच प्रकारची वादग्रस्त व्यक्तव्य करण्यामुळे सतत चर्चेत असतात.

कर्नाटक मध्ये कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या आघाडी सरकारवर टिका करताना विज यांनी राहूल गांधी याच्या विषयी वादग्रस्त विधान केले. मात्र, कॉंग्रेसकडून या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

मागील काही दिवसांपासून केरळ राज्यात निपाह व्हायरसची साथ पसरली आहे. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे 14 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. देशभर या व्हायरसने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. 

 

 

Web Title: rahul gandhi's like nipah virus