उपवनसंरक्षक अधिकाऱ्यावर खानापुरात ‘एसीबी’चा छापा

उपवनसंरक्षक अधिकाऱ्यावर खानापुरात ‘एसीबी’चा छापा

बेळगाव - खानापूर उपविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमाननगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड, स्थावर मालमतेची कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने व दोन जेसीबी असल्याचे स्पष्ट झाले.

बेळगावसह गदग व धारवाडच्या पथकाने संयुक्तरीत्या आज पहाटे सहा वाजता कारवाईस प्रारंभ केला. पाटील यांच्या मालकीची रामतीर्थनगर व हनुमाननगर येथे घरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यरगट्टी (ता. सौन्दत्ती) येथे त्यांच्या मालकीचा विटांचा कारखाना आहे. बैलहोंगल येथे त्यांच्या भावाच्या नावावर दोन जेसीबी आहेत. त्या त्यांच्याच मालकीच्या आहेत का, याची शहानिशाही पथकाकडून करण्यात येत आहे. शिवाय उपवनसंरक्षक अधिकाऱ्यावर खानापुरात एसीबीचा छापाआतापर्यंतच्या तपासात सहा लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने मिळाले आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी ’सकाळ’ला दिली.

एसीबीच्या तीन पथकांनी ही कार्यवाही केली. खानापूर येथील कार्यालयात एसीबीचे निरीक्षक आनंद व्हनकुंद्रे यांच्या नेतृत्वाखालील चार जणांच्या पथकाने कागदपत्रांची छाननी केली. तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानातील कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आली.

तीन कोटींची मालमत्ता
उपवन संरक्षणाधिकारी चंद्रगौडा बसन्नगौडा पाटील यांच्या निवासस्थानी एसीबीच्या छाप्यात सुमारे तीन कोटींची मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यांच्याकडे २,३५,५८,४९५ रुपयांची स्थावर मालमत्ता आणि ६९,२१,८५७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ७५,००,००० किमतीचा रामतीर्थनगर येथे बंगला, २४०० चौरस फुटांचा १,६९,९८५ किमतीचा कुवेंपुनगर येथे भूखंड, ५३,८८,५१० किमतीचा यलहंका येथे एक फ्लॅट, १०,५०,००० किमतीचा यरगट्टी येथे काँक्रीट विटांचा कारखाना अशी एकूण २,३५,५८,४९५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर ८,५०,००० किमतीची मोटार, ९५,००० किमतीची दुचाकी, ६०,००० किमतीच्या दोन दुचाकी, ६,३०,५१० रुपयांची रोकड, १९,७०,२५८ किमतीचे सोन्याचे दागिने, २,५६,०८९ किमतीचे चांदीचे दागिने, १०,००,००० किमतीच्या बॅंकेतील ठेवी, २०,००,००० घरातील साहित्य अशी एकूण ६९,२१,८५७ रुपयांची जंगम मालमत्ता उघडकीस आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com