पोलिसांबरोबरील चकमकीत छत्तीसगडला नक्षलवादी ठार

पोलिसांबरोबरील चकमकीत छत्तीसगडला नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या सुकना जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची माहीत आज पोलिसांनी दिली. पिडमेल आणि पलामडगू गावाच्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात आज सकाळी ही चकमक झाली, असे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांनी सांगितले.

येथून 450 किलोमीटरवर असलेल्या पोलमपल्लीच्या भागात करण्यात आलेल्या या कारवाईपासून जिल्हा राखीव गार्ड आणि विशेष पोलिस पथक दूर होते, असे मीना यांनी सांगितले. पिडमेल आणि पलमडगू येथील जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरण्याची कारवाई सुरू केली, त्या वेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरवात केली. या चकमकीनंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. त्या वेळी तीन देशी बनावटीची शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले, असे ते म्हणाले. या चकमकीत मरण पावलेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली असून, पोदियम भीमा असे त्याचे नाव आहे. पोलिस दलावर हल्ला करणे यासह त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com