'सीआरपीएफ' महासंचालकपदी भटनागर यांची नियुक्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर "सीआरपीएफ'च्या महासंचालकांची रिक्त जागा आता भरण्यात आली आहे. सध्या सुदीप लखताकिया यांच्याकडे "सीआरपीएफ'चा प्रभारी कारभार होता.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. भटनागर हे 1983 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे "आयपीएस' अधिकारी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भटनागर यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर "सीआरपीएफ'च्या महासंचालकांची रिक्त जागा आता भरण्यात आली आहे. सध्या सुदीप लखताकिया यांच्याकडे "सीआरपीएफ'चा प्रभारी कारभार होता.

दरम्यान, इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) महासंचालकपदी आर. के. पचंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1983 च्या तुकडीचे "आयपीएस' अधिकारी असलेले पचंदा हे पश्‍चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत.