रंगभूमीनंतर रजनीकांत अवतरणार राजकारणाच्या भूमीवर?

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या राजकारणात एआयडीएमकेच्या नेत्या शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यातील वाद पेटला आहे. या पार्श्‍वभूमीवर रंगभूमीवर प्रचंड लोकप्रियता मिळविणारे सुपरस्टार अभिनेता रजनीकांत राजकारणात उतरणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे एस. गुरुमूर्ती हे रजनीकांत यांना नवा पक्ष स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे वृत्त आहे. भारतीय जनता पक्षही रजनीकांत यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. तमिळनाडूतील वर्तमान राजकीय परिस्थितीवर रजनीकांत प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच त्यांना राजकारणात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी गुरूमूर्ती हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. सर्व वयोगटातील लोकांना रजनीकांत यांचे आकर्षण आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, असे गुरुमूर्ती यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियावर अभियान
रजनीकांत यांच्या चाहत्यांनी शशिकला यांना मुख्यमंत्री बनवू नये अशी इच्छा व्यक्त करत राज्याला वाचविण्यासाठी रजनीकांत यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यासाठी सोशल मिडियावर मोहिम उघडली आहे.

महानायकाचा सल्ला
सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाबाबत सल्ला दिला आहे. रजनीकांत यांनी राजकारणात येऊ नये, असा सल्ला बच्चन यांनी दिला आहे. बच्चन यांनी 1980 मध्ये राजकारणात उडी घेतली होती. अलाहाबाद त्यांनी 1984 साली त्यांना कॉंग्रेसच्या वतीने लोकसभेचे तिकिट मिळाले होते. त्यामध्ये ते विजयी झाले होते.

Web Title: Rajnikant will be in Politics?