राखीपौर्णिमेची ओवाळणी म्हणून दिले शौचालय!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑगस्ट 2016

रामगड (झारखंड) - राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीला मिठाई आणि भेटवस्तू देण्याच्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत रामगड येथील एका भावाने आपल्या बहिणीला शौचालयची भेट देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.

रामगड (झारखंड) - राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीला मिठाई आणि भेटवस्तू देण्याच्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत रामगड येथील एका भावाने आपल्या बहिणीला शौचालयची भेट देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "स्वच्छ भारत‘ मोहिमेतून पिंटू सॉ नावाचा तरुण प्रेरित झाला. त्यामुळेच त्याने राखीपौर्णिमेनिमित्त रामगड येथील राखी देवी या त्याच्या बहिणीला चक्क प्रसाधनगृह भेट दिले. बहिणीच्या घरी प्रसाधनगृह बांधण्यासाठी पिंटूला 30 हजार रुपये खर्च आला. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना पिंटू सॉ म्हणाला, "मी पंतप्रधानांच्या "स्वच्छ भारत‘ मोहिमेबद्दल ऐकले. माझ्या कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचाला जावे लागते म्हणून शौचालय बांधावे असा विचार माझ्या मनात आला. कोणीही उघड्यावर शौचाला जाऊ नये म्हणून मी माझ्या बहिणीला राखीपौर्णिमेनिमित्त शौचालय भेट देण्याचा निर्णय घेतला.‘