वादग्रस्त ट्विटप्रकरणी रामगोपाल वर्मांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

महिलादिनी केली होती अश्‍लील टिप्पणी

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते रामगोपाल यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी आज त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "मला वाटते की, प्रत्येक महिलेने आपल्या पतीला सनी लियोन प्रमाणे खूश ठेवावे,' असे ट्विट करत रामगोपाल यांनी वाद ओढवून घेतला आहे.

या ट्विटनंतर रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात गोव्यातील सामाजिक कार्यकर्ता विशाखा महाम्बरे यांनी गुन्हा दाखल केला असून, त्याविरोधात रामगोपाल यांच्याविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत सनीचे हजारो चाहते आहेत, याचे कारण ती सुंदर आहे म्हणून नव्हे, तर ती महान व इतरांपेक्षा वेगळी आहे, असे ट्विट केले आहे.
पुरुषांसाठी कोणता दिवस साजरा होत नाही. कारण, वर्षातले सर्व दिवस त्यांचेच असतात. इतकेच नव्हे तर महिला दिनाला खऱ्याअर्थाने पुरुष दिन म्हटले पाहिजे. कारण, पुरुष त्यांना सर्वांत जास्त सेलिब्रेट करतात. महिलांनी पुरुषांवर ओरडू नये, त्यांना पुरेसे स्वातंत्र दिले पाहिजे, अशी आणखी ट्विट्‌सही रामगोपाल वर्मा यांनी करून वाद ओढवून घेतला आहे.

सध्या रामगोपाल वर्मा सरकार-3 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटाचे मुख्य नायक असून, 7 एप्रिल या आपल्या जन्मदिनी ते हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------

माझ्या ट्विटबद्दल चुकीची चर्चा सुरू असून, त्यातून ढोंगीपणा प्रतित होतो. ती (सनी) इतरांच्या तुलनेत इमानदार व स्वाभिमानी आहे. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र आहे, मी बोललो की कायदा हातात घेतल्याचे आरोप होतात. देवा, या देशातील लोकशाहीला वाचव.
- रामगोपाल वर्मा, चित्रपट निर्माते
-अश्‍लील टिप्पणीप्रकरणी रामगोपाल वर्मा यांच्यावर महाराष्ट्र सरकार व महिला आयोगाने गुन्हा दाखल करावा. - कॉंग्रेस
- रामगोपाल वर्मांनी माफी मागितली नाही, तर यापुढे मुंबईत त्यांना चित्रीकरण करू देणार नाही - रामदास कदम, भाजप नेते
- महिलांविषयीच्या अश्‍लील टिप्पणीप्रकरणी माफी मागा; अन्यथा चपलीने मारणार.
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे कॉंग्रेस नेते
-----------------------------------------------------------------------------------------

Web Title: Ram Gopal Varma twitt form Women's Day