रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

मला पाठिंबा व्यक्त केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पदाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज (शुक्रवार) या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवानी, नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू हे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. एनडीएमधील इतर ज्येष्ठ नेतेही यावेळी हजर होते.

"मला पाठिंबा व्यक्त केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पदाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन,'' अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.