"पंतप्रधान जसे कपडे बदलतात तसे आरबीआयच्या नियमात बदल'

पीटीआय
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - बॅंकेत जुन्या नोटा जमा करण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडून वारंवार बदलण्यात येणाऱ्या नियमांबाबत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी कपडे बदलतात, त्याचप्रमाणे आरबीआय आपल्या नियमांत बदल करत आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही सरकार आणि आरबीआय यांच्यात असलेल्या विरोधाभासाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, जुन्या नोटा जमा करण्यावरून केंद्र सरकार आणि आरबीआय आपल्या नियमांत आणि अटीत सातत्याने बदल करत आहे. सोमवारी सरकारने म्हटले, की 5000 हून अधिक जुन्या नोटा एकदाच जमा कराव्या लागतील आणि अशा प्रकारे एकाच वेळी नोटा न भरल्यास पैसे जमा करणाऱ्या खातेदाराची चौकशी केली जाईल. त्यानंतर आता मंगळवारी स्पष्ट करण्यात आले, की पहिल्यांदा अशा पद्धतीने नोटा भरणाऱ्याची चौकशी केली जाणार नाही. यापूर्वीही सरकारने नोटा जमा करण्यावरून आणि पैसे काढण्यावरून अनेकदा अटी आणि नियमांत बदल केले असल्याने विरोधी पक्षाने सरकारवर टीकास्त्र सोडलेले आहे.

देश

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017