रिझर्व्ह बॅंकेसमोरील रांगांना अपात्र लोक जबाबदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेसमोर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या लांब रांगांना अपात्र लोकांची गर्दी जबाबदार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेसमोर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या लांब रांगांना अपात्र लोकांची गर्दी जबाबदार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने नोव्हेंबर-डिसेंबर 2016 या काळात भारताबाहेर असणाऱ्या नागरिकांसाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत दिली आहे. संबंधित काळात जे भारतीय नागरिक परदेशात असतील, त्यांना पुन्हा 30 जूनपर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई व नागपूर या शहरांमधील रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयांमध्ये जुन्या नोटांचा भरणा करता येणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेसमोर लांबच लांब रांगांना अपात्र लोक जबाबदार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राज मेघवाल यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले. याचसोबत रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाइटवर नोटा भरण्याचे नियम व निकष दिल्याचेही या वेळी सांगितले. मुंबई व दिल्ली येथील रिझर्व्ह बॅंकेसमोरील शेजारील राज्यांमधील नागरिकांचे लोक रांगांमध्ये उभे होते, असेही मेघवाल यांनी सांगितले.

नेपाळमध्ये नोटा बदलण्याची सुविधा?
नेपाळ सरकारने भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे नोटा बदलण्याची सुविधा देण्याची मागणी केली आहे. यान्वये प्रत्येक नेपाळी नागरिक 4500 हजार रुपयांच्या जुना नोटा बदलून देण्याची तयारी रिझर्व्ह बॅंकेने दर्शविली आहे. नेपाळमधील केंद्रीय बॅंक असलेल्या नेपाळ राष्ट्र बॅंकेने (एनआरबी) प्रतिनागरिक 25 हजार रुपये बदलून देण्याची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे केली असून, यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हवाईदलाकडून 604 टन नोटांची वाहतूक
नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय हवाई दलाने 604 टन चलनी नोटांची देशभरात वाहतूक केल्याचे माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली. केंद्र सरकारच्या आदेशान्वये भारतीय हवाई दलाने या नोटांची वाहतूक केल्याचेही भामरे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: reserve bank and que