पाकमध्ये बिगर मुस्लिम मतदारांचे प्रमाण वाढले

पीटीआय
मंगळवार, 29 मे 2018

2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नोंदणीकृत अल्पसंख्याक मतदारांची संख्या 27 लाख 70 हजार होती, ती यंदा 36 लाख 30 हजार झाली आहे. त्यात 17 लाख 70 हजार हिंदू मतदार असून, त्यात 3 लाख 70 हजाराने वाढ झाली आहे.
 

 
इस्लामाबाद - पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत असून, यंदा बिगर मुस्लिम किंवा अल्पसंख्याक मतदारांची संख्या तीस टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नोंदणीकृत अल्पसंख्याक मतदारांची संख्या 27 लाख 70 हजार होती, ती यंदा 36 लाख 30 हजार झाली आहे. त्यात 17 लाख 70 हजार हिंदू मतदार असून, त्यात 3 लाख 70 हजाराने वाढ झाली आहे.

सर्वांत जास्त हिंदू मतदार सिंध प्रांतात असून, त्यात दोन जिल्ह्यांत एकूण मतदारांपैकी चाळीस टक्के मतदार हिंदू आहेत. बिगर मुस्लिम मतदारात ख्रिश्‍चन मतदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानात यंदा 16 लाख 40 हजार ख्रिश्‍चन मतदार आपला हक्क बजावतील. त्यापैकी दहा लाख ख्रिश्‍चन पंजाब प्रांतात राहतात. सुमारे दोन लाख ख्रिश्‍चन मतदार सिंध प्रांतात आहेत. 2013 ची निवडणूक पाहता हिंदूंच्या तुलनेत ख्रिश्‍चन मतदारांची संख्या वेगाने वाढली आहे. 
 

Web Title: rise in non-Muslim voters in Pakistan