काँग्रेसने 'सर्जिकल' पुरावे मागितल्याने मी भाजपात!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- "भाजपमध्ये प्रवेश करणाचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे, पण काँग्रेसने त्यावर मागितलेले पुरावे आणि विचारलेले प्रश्न मला आवडले नाहीत, असे बहुगुणा यांनी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना सांगितले.

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या असलेल्या रिटा बहुगुणा या 2007 ते 2012 यादरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेसच्या प्रेदशाध्यक्ष होत्या.