केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : संघ

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

केरळमधील कायदा आणि सुव्यवस्था अराजकतेच्या पातळीपर्यंत पोचली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

नवी दिल्ली - केरळमधील कायदा आणि सुव्यवस्था अराजकतेच्या पातळीपर्यंत पोचली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

केरळमधील कोझीकोड येथे शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तीन स्वयंसेवकांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीपीएमच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघ आणि सीपीएममध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना संघातील विचारवंत राकेश सिन्हा म्हणाले, "हिंसेच्या आणि संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ला करण्याच्या घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. त्यांनी नागरी युद्ध पुकारले आहे. ते देशभरातील स्वयंसेवकांना डिवचत आहेत. त्यामुळेच मी केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत आहे.'

सिन्हा यांनी यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "केरळच्या मुख्यमंत्र्यांनी संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्याचा निश्‍चय केला आहे. केवळ ते एकटेच आरोपी आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणीही दोषी नाही. केरळ सरकारच्या हिंसक कृत्ये स्वीकारल्याबद्दल मी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षालाही दोषी धरतो.'

Web Title: RSS demands President's rule in Kerala : RSS