'आरएसएस'ने केवळ दोनच वेळेस भाजपसाठी लावली आहे पूर्ण ताकद

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जुलै 2018

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना होवून 93 वर्षे झाली आहेत. या काळात संघाने केवळ दोनच वेळेस निवडणुकांत भाजपसाठी पूर्ण ताकद लावली आहे. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये संघ भाजपच्या पाठीमागे उभा राहणार की नाही याबाबत मात्र शंका आहे. संघावर नुकत्याच आलेल्या 'आरएसएस: ए व्यू टू द इंसाइड' या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना होवून 93 वर्षे झाली आहेत. या काळात संघाने केवळ दोनच वेळेस निवडणुकांत भाजपसाठी पूर्ण ताकद लावली आहे. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये संघ भाजपच्या पाठीमागे उभा राहणार की नाही याबाबत मात्र शंका आहे. संघावर नुकत्याच आलेल्या 'आरएसएस: ए व्यू टू द इंसाइड' या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे.

या पुस्तकात, सन 1977 आणि सन 2014 मध्येच संघाने भाजपसाठी आपली पूर्ण ताकद लावलेली आहे, असे म्हटले आहे. पुढे या पुस्तकात सांगितले आहे की, प्रत्येकच निवडणुकीमध्ये संघाने भाजपला मदत करायलाच हवी असे नाही. ज्यावेळी संघाने भाजपला पूर्ण ताकदनिशी मदत केलेली आहे, त्यावेळी संघाला अशी भीती होती की, काँग्रेसपासून संघाच्या हिंदू एकता कार्यक्रमाला धोक निर्माण होईल, म्हणून संघाने भाजपला मदत केली होती.

देशात, 1975 साली आणीबाणी लागू करण्यात आली होती. या दरम्यान, इंदिरा गांधींच्या सरकारने संघाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले होते. त्यामुळे 1977 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या तर संघाला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. म्हणून संघाने 1977 च्या लोकसभा निवडणुकांत पूर्ण ताकदनिशी भाजप म्हणजेच त्यावेळच्या जनसंघाला मदत केली होती. यावेळी भाजपचे सरकार जास्तवेळ सत्तेत राहिले नाही परंतु, काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर, 2014 मध्ये काँग्रेस परत सत्तेत आली तर संघाच्या हिंदू एकता कार्यक्रमाला मोठा धक्का बसेल. म्हणून त्यांनी यावेळी भाजपच्या बाजूने पूर्ण ताकद लावली. यावेळी मात्र भाजपचे सरकार सत्तेत आले.

Web Title: RSS Fully Invested Itself in BJPs General Poll Campaigns Only Twice in its History Claims Book