गुजरातमधील जातीय दंगलीत एकाचा मृत्यू

पीटीआय
रविवार, 26 मार्च 2017

नवी दिल्ली - पाटन जिल्ह्यातील वडवाली गावामध्ये किरकोळ कारणावरून दोन समुदायात झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, यात अन्य सहा जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - पाटन जिल्ह्यातील वडवाली गावामध्ये किरकोळ कारणावरून दोन समुदायात झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, यात अन्य सहा जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या 10 वीची परीक्षा सुरू असून, दोन विद्यार्थी पेपर देऊन शाळेतून बाहेर पडताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. नंतर याचे रूपांतर भांडणात झाले. ही वार्ता गावात समजल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर धावून आले. या वेळी झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, आतापर्यंत एकूण 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतप्त जमावाने काही घरांबरोबर वाहनांचीही जाळपोळ केली असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या पार्श्वभूमीवर येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.