हेल्मेट डालो भाई! : सचिनचे तरुणांना आवाहन

टीम ई सकाळ
रविवार, 9 एप्रिल 2017

सचिनने त्यांच्याजवळ गाडी थांबवत काच खाली घेतली आणि त्यांना जवळ बोलावत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले.

हैदराबाद : आपल्या क्रिकेट कारकिर्दीत विनम्रतापूर्वक अनेक मैदाने गाजविल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाबाहेरही तेवढ्या विनम्रपणे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून लोकांमध्ये जागकरुकता निर्माण करण्यात तत्पर असल्याचे दिसून येते. सचिनने हैदराबादमध्ये आपली गाडी रस्त्यात थांबवत दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. 

 

सचिनने त्याच्या ट्विटर हँडलवरून हेल्मेटबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हैदराबादमधील उप्पल रोडवरुन सचिन जात होता तेव्हा त्यानं काही युवक दुचाकीवरुन हेल्मेट न घालता जात असलेले पाहिले. सचिनने त्यांच्याजवळ गाडी थांबवत काच खाली घेतली आणि त्यांना जवळ बोलावत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. खासदार आदर्श ग्राम योजना तसेच स्वच्छ भारत अभियानामध्ये 

प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरला पाहून दुचाकीवरील युवकही सेल्फी घेण्यासाठी पुढे येऊ लागले. मात्र सचिनने या दुचाकीस्वारांना प्राधान्याने हेल्मेट घालण्याचे आवाहन केले. ‘आयुष्य अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा,' असे सचिनने सांगितले.