सहारनपूरमध्ये पुन्हा हिंसाचार एक ठार; पोलिसांकडून 24 जणांना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

सहारनपूरमध्ये मंगळवारी नव्याने झालेल्या दोन गटातील हाणामारीत एक जण ठार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे.

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : सहारनपूरमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा झालेल्या दोन गटातील हाणामारीत एक जण ठार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे.

या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाच मे रोजी सहारनपूर येथे ठाकूर समुदायाने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीला दलित समुदायाने विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत एक जण ठार तर 15 जण जखमी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी सहारनपूरचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यानंतर दोन गटात झालेल्या हाणामारीत एक जर ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 24 जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिक्षक एस. दुबे यांनी माहिती दिली. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे दुबे यांनी सांगितले.

भाजपची मायावतींवर टीका
सहारनपूरच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मायावतींवर निशाणा साधला आहे. 'दलितांसाठी काहीतरी करण्याऐवजी सत्ताहीन मायावती केवळ नक्राश्रू ढाळत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशमधील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

हेलिकॉप्टर दौऱ्याची परवानगी नाकारली
मायावती यांनी सहारनपूरला हेलिकॉप्टरने प्रवास करून भेट देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली होती. या पार्श्‍वभूमीवर मायावती यांनी 'माझ्या सहारनपूर दौऱ्यादरम्यान मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल', असे म्हणत इशारा दिला होता.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM