मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेत गैर काय -साक्षी

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

लखनौ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत महत्वाकांक्षा असण्यात गैर काय, असे म्हणत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले आहे.

 

लखनौ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत महत्वाकांक्षा असण्यात गैर काय, असे म्हणत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले आहे.

 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांकडून स्वतःची दावेदारी सांगण्यास सुरवात केली आहे. अलहाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत वरुण गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आता ओबीसी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून साक्षी महाराजांनी स्वतःची दावेदारी सांगितली आहे. साक्षी महाराज हे लोढ समुदायाचे असून, उत्तर प्रदेशातील लोकसंख्येच्या तीन टक्के लोकसंख्या लोढ समुदायाची आहे.

 

साक्षी महाराज म्हणाले की, भाजपमध्ये अनेक नेते या पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मीही या पदाबाबत महत्वाकांक्षा ठेवण्यात गैर काय आहे. स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, महेश शर्मा, दिनेश शर्मा, वरुण गांधी आणि मी असे सर्वजण या पदाच्या शर्यतीत आहोत.