ATM च्या रांगेत खातेधारकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोलकता : जुन्या नोटांवर बंदी घातल्यापासून सुरू झालेले सर्वसामान्यांचे हाल अद्याप थांबलेले नाहीत. ATM मधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या स्टेट बँकेच्या ATM मध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या ज्येष्ठाचे नाव आहे. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. घराजवळच असलेल्या ATMमधून पैसे काढण्यासाठी चौधरी गेले होते. चौधरी रांगेत उभे असतानाच अचानक कोसळले, असे बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये नोटा काढताना झालेल्या अशा दुर्दैवी घटनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली. बिजॉन मुखर्जी (वय 73, रा. मचलंदापूर, जि. उत्तर परगणा) यांना ATMच्या रांगेत हृदयविकाराचा झटका आला होता. 

तसेच विश्‍वास नासकर (वय 79) या माजी शिक्षकाचा यूबीआयच्या शाखेत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. 
ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रैदहिगी येथे घडली. देशात अशा प्रकारच्या 84 घटना घडल्या असून, मोदी बाबू यांना आणखी किती घटना हव्या आहेत, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017