ताबारेषेवर सात पाकिस्तानी सैनिक ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद- भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात ताबा रेषेवरील (LoC) सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे. 
भिमबेर सेक्टरमध्ये रात्री भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले असे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे. ताबारेषेनजीक भारतीय लष्कराने तोफांचा मोठा मारा केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
या गोळीबारानंतर पाककडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. मागील काही आठवड्यांमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या कथित गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 25 झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारताने पाक पुरस्कृत घुसखोरीचे डाव 61 वेळा हाणून पाडले आहेत. 

पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 
देश

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने...

02.06 PM

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये...

01.48 PM

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM