शिवराजसिंह यांनी असा केला पूर पाहणी दौरा

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चक्क दोन पोलिसांना उचलून घ्यायला सांगत पूर पाहणी दौरा केला. शिवराजसिंह यांचे हे छायाचित्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चक्क दोन पोलिसांना उचलून घ्यायला सांगत पूर पाहणी दौरा केला. शिवराजसिंह यांचे हे छायाचित्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशात जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. पन्ना जिल्ह्यातील अमानगंज तालुक्यात पूर पाहणी करण्यासाठी गेले असताना शिवराजसिंह यांना दोन पोलिसांनी उचलून घेत पाण्यातून नेले. या दौऱ्यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हे छायाचित्र काढून सोशल मिडीयावर अपलोड केल्यानंतर यावर खूप चर्चा होत आहे. आपली पांढरी पॅन्ट खराब होऊ नये, यासाठी शिवराजसिंह यांनी पोलिसांना उचलून घ्यायला सांगितले अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या पाण्यातून चालताना मुख्यमंत्र्यांना साप चावू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांना उचलून घेण्यास सांगितले. शिवराजसिंह यांनी रेवा, सतना आणि पन्ना या जिल्ह्यांचा पूर दौरा केला. मध्य प्रदेशात आतापर्यंत पुरामुळे 17 जणांचा बळी गेला आहे.

देश

गंगटोक - कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे अनेक यात्रेकरू माघारी परतले असून, यामुळे चीनचा...

03.03 AM

पुरी (ओडिशा) - येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता देश-परदेशातील...

03.03 AM

श्रीनगर - श्रीनगरच्या बाहेर सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू झालेली चकमक आज तब्बल चौदा तासांनी सायंकाळी सहाच्या सुमारास...

02.03 AM