तिरंगा फडकविण्यापासून शिवसैनिकांना रोखले

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

श्रीनगरच्या लाल चौकात पोलिसांनी घेतले ताब्यात

श्रीनगर : येथील लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न रोखून पोलिसांनी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
लाल चौक अतिशय संवेदनशील असून, अनेकदा हा भाग हिंसाचारामध्ये होरपळून निघाला आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे तिरंगा फडकविण्यास परवानगी देण्यात येत नाही.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे कार्यकर्ते दोन गाड्यांमधून लाल चौकातील "घंटा घर' परिसरात आले आणि त्यांनी तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना कोटीबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. येथे कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर सोडून देण्यात आले.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी गेल्या आठवड्यात पाकव्याप्त काश्‍मीर हा पाकिस्तानचाच भाग असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या; तसेच केंद्र सरकार आणि भाजप पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तिरंगा फडकावण्याची भाषा करतात. त्यांनी आधी श्रीनगरमधील लाल चौकात जाऊन तिरंगा फडकावून दाखवावा, ते हेच करू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्‍मीरबाबत बोलतात, असेही अब्दुल्ला म्हणाले होते.

या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेच्या जम्मू शाखेने एका खास पथकाद्वारे ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला.

Web Title: srinagar news Shiv Sainik prevented from hanging the tricolor