बिहारमध्ये वादळ; पावसाचे पंधरा बळी

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

लखीसराई, औरंगाबाद, मधुबनी, बेगुसराई जिल्ह्यांत प्रत्येकी दोन, तर पाटणा, नालंदा, पुरलिया, सुपाल, मुंगेर, अरारिया या जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा या वादळी पावसात बळी गेला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे

पाटणा - बिहारमध्ये आज घोंघावणारे वादळ व पावसामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला. आज झालेल्या या वादळ व पावसामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांत उभ्या पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळाने राज्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. राज्यात 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या सकाळीही आणखी वादळ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव प्रत्यय अप्रित यांनी राज्यातील हानीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""लखीसराई, औरंगाबाद, मधुबनी, बेगुसराई जिल्ह्यांत प्रत्येकी दोन, तर पाटणा, नालंदा, पुरलिया, सुपाल, मुंगेर, अरारिया या जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा या वादळी पावसात बळी गेला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.''

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM